Magel Tyala Vihir Yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मागेल त्याला विहीर योजना 2024 सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे आणि त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान टाळणे आहे.
Magel Tyala Vihir Yojana I मागेल त्याला विहीर योजना माहिती
योजनेचे नाव: मागेल त्याला विहीर योजना 2024
कोणाद्वारे सुरु: महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे
उद्देश: शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान
विभाग: कृषी विभाग
लाभार्थी: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ: ४ लाख रुपये अनुदान
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन/ ऑफलाईन
Magel Tyala Vihir Yojana I मागेल त्याला विहीर योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून, राज्य सरकारने मागेल त्याला विहीर योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मिळते आणि पिकांचे नुकसान टाळता येते.
पात्रता (Eligibility)
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याजवळ शेती करण्यासाठी योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे कमीत कमी ०.४० हेक्टर इतकी जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याची जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिक दृष्टीने पात्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वरती यापूर्वी विहिरींची नोंद नसली पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- समजा अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सह हिस्सेदार असतील तर अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Magel Tyala Vihir Yojana I मागेल त्याला विहीर योजना उद्देश
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होण्यासाठी मदत करणे.
- शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे नुकसान टाळणे.
- शेतकऱ्यांना पाण्याची चिंता न करता शेती करता यावी.
Magel Tyala Vihir Yojana I मागेल त्याला विहीर योजना फायदे
- विहीर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती पिकासाठी तसेच पिण्यासाठी सुद्धा पाण्याची उपलब्धता मिळते.
- पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा पाणी नसल्यामुळे पिकांचे नुकसान टाळता येते.
- शेतकरी व इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतात.
- शेतकऱ्यांचा शेती या व्यवसायाकडे दृष्टीकोन बदलतो आणि ते शेती क्षेत्रात टिकून राहतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याची माहिती
- रहिवाशी दाखला
- जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
- रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा जास्त सलग जमीन असल्याचा पंचनामा व सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- जवळच्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जा.
- ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्या.
- जिल्हा कार्यालयामध्ये कृषी विभागामध्ये जाऊन अर्ज घ्या.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयामध्ये जमा करा.
- अर्ज पिडीएफ
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
- मागेल त्याला विहीर योजना यावर क्लिक करा.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट बटनावर क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट
मागेल त्याला विहीर योजना 2024 ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांच्या पिकांचे नुकसान टाळता येईल. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतीसाठी पाण्याची चिंता न करता अधिक उत्पादन घेऊ शकतात.
1 thought on “Magel Tyala Vihir Yojana! मागेल त्याला विहीर योजना 2024: शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना”