shasanachiyojana.com

शासकीय योजना

महाराष्ट्र कामगार नोंदणी: मोबाईल वरून कामगार नोंदणी कशी करावी?

महाराष्ट्र कामगार योजना

महाराष्ट्र कामगार नोंदणी : महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रातील कामगार हे सगळ्यात जास्त प्रमाणात असंघटित कामगार आहेत. कामाच्या शोधात अनेक ठिकाणी स्थलांतर करणारे हे कामगार आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीत मागासलेले असतात. त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत कामगारांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात.

महाराष्ट्र कामगार नोंदणी

महाराष्ट्र कामगार कल्याणकारी योजना

A) सामाजिक योजना

  • पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रु. ३०,००० मदत
  • मध्यान्न भोजन योजना
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • पूर्व शिक्षण ओळख योजना

B) शैक्षणिक योजना

  • इयत्ता १ ली ते ७ वी शिष्यवृत्ती: रु. २,५०० प्रतिवर्ष
  • इयत्ता ८ वी ते १० वी शिष्यवृत्ती: रु. ५,००० प्रतिवर्ष
  • इयत्ता १० वी ते १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास: रु. १०,००० शिष्यवृत्ती
  • इयत्ता ११ वी व १२ वी शिष्यवृत्ती: रु. १०,००० प्रतिवर्ष
  • पदवी अभ्यासक्रम: रु. २०,००० प्रतिवर्ष
  • वैद्यकीय पदवी: रु. १ लाख प्रतिवर्ष
  • अभियांत्रिकी पदवी: रु. ६०,००० प्रतिवर्ष
  • शासनमान्य पदविकेसाठी: रु. २०,००० प्रतिवर्ष
  • पदव्यत्तर पदविकेसाठी: रु. २५,००० प्रतिवर्ष
  • MSCIT शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती

C) आरोग्य विषयक योजना

  • नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,००० मदत
  • शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,००० मदत
  • गंभीर आजारासाठी रु. १ लाख मदत
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे रु. १ लाख मदत ठेव
  • कायमचे अपंगत्व आल्यास रु. २ लाख मदत
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
  • आरोग्य तपासणी

D) आर्थिक योजना

  • कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५ लाख मदत
  • नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाख मदत
  • अटल बांधकाम कामगार दिवस योजना: २ लाख रुपये
  • अंत्यविधी खर्चासाठी रु. १०,००० मदत
  • विधवा पत्नी अथवा विधुर पतीस रु. २४,००० मदत
  • गृह कर्जावरील रु. ६ लाख पर्यंत व्याजाची रक्कम

महाराष्ट्र कामगार नोंदणी प्रक्रिया

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी?

  1. https://mahabocw.inवर जा.
  2. “बांधकाम कामगार: नोंदणी-Construction Worker:Registration” या पर्यायावर क्लिक करा.
  3. नवीन पेज ओपन होईल, त्यावर जिल्हा, आधार नंबर, आणि मोबाईल नंबर टाका.
  4. SUBMIT क्लिक करा आणि फॉर्म ओपन होईल.
  5. फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा.
  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र).

आवश्यक कागदपत्रे

  • बांधकाम कामगारांचे आधार कार्ड
  • कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र

मोबाईल वरून कामगार नोंदणी

मोबाईलच्या साह्याने  https://mahabocw.in ओपन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. आवश्यक कागदपत्रे मोबाईलमध्ये सेव्ह करून अपलोड करा. महाराष्ट्र कामगार नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन केली जाऊ शकते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे २ महिने लागतात. मंडळाकडून तुमच्या ऑनलाईन फॉर्मची स्थिती तुम्हाला SMS द्वारे टप्प्याटप्प्याने कळवली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, मंडळाची फी भरण्यासाठी तुम्हाला एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर जाऊन, तुम्ही मोबाईल ऍपद्वारे मंडळाची फी भरू शकता. फी भरल्यानंतर, तुम्हाला कामगार मंडळाकडून १२ अंकी नोंदणी क्रमांक प्रदान केला जातो, ज्यामुळे तुम्ही कामगार मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र कामगार नोंदणीसाठी मोबाईलचा वापर करून सोयीस्करपणे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते. यामुळे कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत मिळते. मोबाईलवरून कामगार नोंदणी करण्यासाठी वरील दिलेल्या सूचना पाळून तुम्ही सहजतेने नोंदणी करू शकता.