Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल. ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच, योजना अधिक सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत.
बैठकीतील उपस्थित नेते
विधानभवन समिती कक्षात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana पूर्वीचे नियम
जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहणारी महिला आहात आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करावी लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 चा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असतील. राज्यातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगटऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला,… https://t.co/e6k2Q4w9wl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2024
पात्रता:
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना पात्रता आहे.
वयाची 21 वर्षे पूर्ण आणि 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
बँक खाते असणे आवश्यक आहे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता:
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी आहेत.
इतर आर्थिक योजनांमधून रु. 1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतल्यास.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय मंडळांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत आहेत
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड.
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
उत्पन्नाचा दाखला.
बँक खाते पासबुकची प्रत.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
रेशन कार्ड.
योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र
योजनेची अंमलबजावणी:
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
तात्पुरती यादी प्रकाशित होणे.
आक्षेप नोंदणी आणि निवारण.
अंतिम यादी प्रकाशित होणे.
लाभार्थ्यांचे बँक खात्यात निधी हस्तांतरण.
योजनेची कालमर्यादा:
अर्ज प्रक्रिया सुरु होणे: 1 जुलै, 2024
अर्ज प्रक्रिया संपणे: 15 जुलै, 2024
तात्पुरती यादी प्रकाशित होणे: 16 जुलै, 2024
आक्षेप नोंदणी कालावधी: 16 जुलै ते 20 जुलै, 2024
आक्षेप निवारण कालावधी: 21 जुलै ते 30 जुलै, 2024
अंतिम यादी प्रकाशित होणे: 1 ऑगस्ट, 2024
लाभार्थ्यांचे बँकेत E-KYC: 10 ऑगस्ट, 2024
निधी हस्तांतरण: 14 ऑगस्ट, 2024
योजनेचे नवे नियम
1 thought on “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय”