Ramai Gharkul Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाद्वारे 2024 साली अद्ययावत करण्यात आलेली रमाई घरकुल योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित कुटुंबांना परवडणारी घरे पुरवण्याचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे.
Ramai Gharkul Yojana 2024 विषयी सविस्तर माहिती
सध्याच्या परिस्थितीत देशातील आणि राज्यातील जमिनीच्या वाढत्या किंमतींमुळे अनेक नागरिकांना स्वतःचे घर विकत घेणे कठीण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना कच्ची घरे किंवा झोपड्या बांधून राहावे लागते. हे सर्व नागरिक आर्थिक दुर्बल घटकांमध्ये येतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध नागरिकांना घरे देण्यासाठी रमाई घरकुल योजना सुरु केली आहे.
दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असणाऱ्या परंतु इंदिरा आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीत ज्यांची नावे नाहीत आणि जे नागरिक बेघर आहेत त्यांनाही या योजनेंततून अनुदान देण्यात येईल. आपल्या देशात दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्या राज्यात रहायला स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ते इकडे तिकडे भटकत असतात व रस्त्याच्या लगत झोपडी बांधून राहतात तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे स्वतःचे घर बांधण्यासाठी सक्षम नसतात.
Ramai Gharkul Yojana 2024 चे उद्दिष्टे
- राज्यातील नागरिकांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील गरीब वर्गाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे.
- गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे.
- झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे.
Ramai Gharkul Yojana 2024 ची वैशिष्ट्ये
- मुख्य उद्देश: राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांसाठी पक्की घरे उपलब्ध करून देणे.
- प्रमुख गृहनिर्माण योजना: ही योजना भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाने (MoHUPA) सुरू केलेली आहे.
- विधवा महिलांसाठी: ही योजना विधवा महिलांसाठी घरकुल योजना या नावानेही ओळखली जाते.
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
Ramai Gharkul Yojana 2024 अंतर्गत वित्तीय सहाय्य
- सर्व साधारण क्षेत्रासाठी: ₹1.3 लाख रुपये अनुदान.
- शहरी भागासाठी: ₹2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत.
- डोंगराळ भागासाठी: ₹1.42 लाख रुपये अनुदान.
- शौचालय बांधण्यासाठी: ₹12,000/- रुपये अनुदान.
Ramai Gharkul Yojana 2024 पात्रता निकष
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे स्वतःचे घर नसणे आवश्यक.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गाला प्राधान्य.
- विधवा आणि एकल महिलांना प्राधान्य.
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
- शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडून रमाई घरकुल योजनेवर क्लिक करावे.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरून सबमिट करावे.
- लॉगिन करून Username आणि Password टाकावे.
- अर्जामध्ये सर्व कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावे.
रमाई घरकुल योजना 2024 – महत्वपूर्ण तारखा आणि लिंक्स
क्रमांक | विवरण | तारीख/लिंक |
---|---|---|
1 | ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 1 मार्च 2024 |
2 | ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख | 30 नोव्हेंबर 2024 |
3 | शासनाची अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
4 | रमाई घरकुल योजना अर्ज | क्लिक करा |
5 | रमाई घरकुल योजना GR | क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया:
- ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय किंवा महानगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.
Ramai Gharkul Yojana 2024 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया
- लाभार्थ्यांची निवड सामाजिक, आर्थिक आणि जात सर्वेक्षण 2011 नुसार पारदर्शकपणे केली जाते.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध प्रवर्गातील ज्यांच्या स्वतःचे घर नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- लाभार्थ्यांची निवड ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत मंजुरी देऊन केली जाते.
- शहरी भागात महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या मार्फत मंजुरी दिली जाते.
- अर्जांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते.
Ramai Gharkul Yojana 2024 अनुदान वितरण कार्यपद्धती
- पहिला हफ्ता: घराचे बांधकाम सुरू करताना 50% अनुदान बँकेच्या खात्यात जमा.
- दुसरा हफ्ता: 50% निधीचा उपयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40% अनुदान.
- तिसरा हफ्ता: घर पूर्ण झाल्यावर उर्वरित 10% अनुदान.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड.
- जातीचे प्रमाणपत्र.
- BPL प्रमाणपत्र.
- विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
- घर टॅक्स पावती, असेसमेंट पावती.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- सहहिस्सेदार असल्यास संमतीपत्र.
- जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला.
- इतर योजनांचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र.
- पूरग्रस्त असल्यास पुरावा.
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- 15 वर्षे महाराष्ट्र रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
- राशन कार्ड.
- 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.
- बँकेत Joint Account.
Ramai Gharkul Yojana 2024 I नवीनतम अपडेट्स
- पात्रता निकषांमध्ये बदल: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक.
- अनुदान रकमेत वाढ: अर्जदारांना ₹3 लाख पर्यंतचे अनुदान मिळू शकते.
- बँक कर्जाच्या व्याजदरावर सबसिडी: कर्जावरील व्याजदरावर सबसिडी.
- विमा संरक्षण: विमा संरक्षणाचा समावेश.
- ऑनलाइन अर्ज: 1 मार्च 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत.
रमाई घरकुल योजना 2024 ही महाराष्ट्रातील गरीब आणि वंचित कुटुंबांसाठी एक वरदान आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनात सुधारणा करणे हे महाराष्ट्र शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा आणि स्वतःच्या हक्काचे घर मिळवावे.